त्याचे वर्णन तत्कालीन ऑक्सफर्डचे प्रतिनिधी 'स्कूला सेकंडा इक्लेसिआ' असे करीत. त्यातूनच पुढे तेराव्या शतकात ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली असावी. मध्ययुगात रॉजर बेकन, जॉन स्कोट्स व जॉन विक्लिफ ह्यांनी विद्यापीठाची महती वाढविण्याचा प्रयत्न केला.