ओशनिया हा पृथ्वीवरील एक खंड आहे. ओशनिया खंडामध्ये प्रशांत महासागरात पसरलेली अनेक बेटे आहेत. ओशनिया खंडाचे साधारण ४ भाग गणले जातात: ऑस्ट्रेलेशिया, मेलनेशिया, मायक्रोनेशिया व पॉलिनेशिया. ओशनिया खंडातील महत्त्वाचे देश ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, पापुआ न्यू गिनी, फिजी हे आहेत.