औद्योगिक शिक्षण : उद्योग व व्यापार या क्षेत्रांतील व्यावसायिक कार्यक्षमता व समायोजन ह्यांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी शिक्षणाची एक शाखा. त्यायोगे ज्ञानाचे व अनुभवांचे पाठबळ मिळून व्यक्ती औद्योगिक व्यवसायात यशस्वी होऊ शकते.