औरंगाबाद हे राज्यातील मध्यवर्ती शहर असून येथील भौगोलिक परिस्थिती, वातावरण चांगले असल्याने मुंबई, पुण्यानंतर औरंगाबाद शहरात राहण्यास पसंती मिळत आहे. एका दशकात शहर व परिसराचा झालेला विकास, वाढलेल्या पायाभूत सुविधांमुळे शहर व परिसरातील नागरी भाग झपाट्याने विकसित होत आहे. शहराला निसर्गाचे देणे लाभले असून चारही बाजूने टेकड्या, रमणीय डोंगर आहेत. येथील वातावरण हे राहण्यासाठी उत्कृष्ट आहे. यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मोठे अधिकारी, पुणे-मुंबईनंतर औरंगाबादला पसंती देत आहेत. क्रेडाईने आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही बाब अधोरेखित होत आहे.