कंपनी कायदा म्हणजे काय?

कंपनी कायदा आणि नोंदणी करार
एकदा व्यवसाय व्यक्तीगतरीत्या अथवा भागीदारीत केल्यास भांडवलाच्या कमतरतेमुळे त्याच्या वाढीस मर्यादा येतात. भांडवलाची ही गरज व्यवसायाचे रुपांतर सार्वजनिक मर्यादीत कंपनीत करून किंवा सुरुवातच कंपनीची स्थापना करून करता येते. आवश्यकता असल्यास कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन वेगवेगळे ठेवता येऊ शकते.