(२) मुक्त संमती : संमती म्हणजे एखादया गोष्टीबाबत एकाच अर्थाने सहमत असणे. करार करणाऱ्यांची संमती मुक्त पाहिजे. ती मुक्त नसते, तेव्हा गुन्ह्याचा धाक (कोअर्शन), गैरवाजवी दडपण (अन्ड्यू इन्फ्ल्यूएन्स), अपवेदन (मिस्रेप्रेझेंटेशन) किंवा कपट (फ्रॉड) यांमुळे प्रेरित असते.