कंपनी कायदा कलम २ (३४) नुसार 'संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळात नियुक्त केलेले संचालक'. साध्या शब्दात सांगावयाचे झाले तर, कंपनी कार्याची दिशा ठरविण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजेच संचालक होय.