वस्तू वाया घालवण्याचे प्रमाण कमी करणे, सवयी बदलणे, हाताला वळण लावणे, स्वतःला शिस्त लावणे, सार्वजनिक स्वच्छतेची मूल्ये जपणे. वस्तूंचा वापर कमी कराः चाळीस मायक्रॉनखालील प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणे, वस्तूंची वेष्टने कमी करणे. वस्तू पुन्हा वापरणेः 'वापरा आणि फेका' ऐवजी 'वापरा आणि पुन्हा वापरा' अशी सवय लावून घ्या.