निर्लेखीकरण (राइट ऑफ) काय आहे? जे कर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही जाणीवपूर्वक कर्ज चुकवत नाही त्यांना विलफुल डिफॉल्टर म्हटलं जातं. विलफुल डिफॉल्टरकडून कर्जाच्या परतफेडीची शक्यता पूर्णत: मावळते तेव्हा बँक या लोकांनी घेतलेलं कर्ज थकलं असं मानून ते बुडाले समजून बुडीत खात्यात टाकून म्हणजेच निर्लेखित करून टाकते.