कविता म्हणजे काय?
✅ Updated recently
अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद-मुक्तशैलीत लिहिली गेलेली संहिता आपण कविता म्हणून स्वीकारत असतो. अलीकडच्या काळात सुधीर रसाळ यांनी प्रतिमेला केंद्रीभूत मानून "शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय,' अशी एक व्याख्या केली.