पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करणे तसेच आपल्या भागातील गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे हे मोहल्ला समित्यांचे मुख्य काम असते. मोहल्ला समित्यांचे सदस्य पोलिसांचे कान व डोळे होऊन काम करतात आणि सांप्रदायिक, सामाजिक, कायदा-सुव्यवस्थाविषयक माहिती ते स्थानिक क्षेत्र अधिकाऱ्याला (बीट ऑफिसर) देतात.