कायमधारा पद्धतीमुळे ब्रिटीशांचे बंगाल प्रांतातील महसूल उत्पन्न निश्चित आणि नियमित झाले. महसूल निश्चित करण्यासाठी वारंवार करावा लागणारा खर्चही त्यामुळे वाचला. जमीनदारांनी द्यावयाच्या महसूलाची रक्कम निश्चित झाल्याने त्यांना त्यांच्या जमिनीत सुधारणा करण्यासाठी व पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रेरणा मिळाली.