कार्बन संयुगे म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कार्बनी धातु संयुगे : (किंवा धातु -कार्बनी संयुगे). ज्या संयुगांमध्ये कार्बनी गट किंवा मूलके (विक्रियांमध्ये तसेच राहणारे पण सामान्यतः वेगळे अस्तित्व नसणारे अणूंचे गट) यांत कार्बनाचे अणू धातूंच्या अणूला प्रत्यक्ष जोडलेले असतात, त्या संयुगांना कार्बनी धातू संयुगे असे म्हणतात.