कालवा सिंचन व्यवस्थापन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कालवे म्हणजे पाणी वाहून नेण्याकरतां, किंवा शेतीला पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेला जमीनींतील सखल मार्ग होय. याचा उपयोग होड्या, जहाजें, वाहने चालविण्याकरता होतो. हा तयार केलेला कृत्रिम जलमार्ग आहे.सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय. जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.