कालव्याचा आकार काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कालव्याचा आकार : सामान्यत: कालव्याचा आकार समलंबी असतो. याचे काठ १·५ : १ ते ३ : १ या प्रमाणात किंवा यापेक्षा ढाळते असतात. नौकांच्या हालचालीने पाण्यात उत्पन्न होणाऱ्या खळबळाटामुळे व लाटांमुळे काठ धुपून जाऊ नयेत म्हणून पाण्याच्या कोरीच्या आसपासच्या भागास अस्तर घालतात किंवा डबराची तोंडबांधणी करतात.