महासागर,समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी त्याशेजारची कोरडी जमीन यामधील सीमारेषेला किनारा म्हणतात. नदीतीरालाही कित्येकदा नदीकिनारा म्हणतात. काही वेळेला किनाऱ्याला लागून असलेल्या कमीअधिक रूंदीच्या सखल प्रदेशालाही किनारा म्हणतात; परंतु त्याला किनारी प्रदेश किंवा किनारी मैदान म्हणणे अधिक योग्य ठरेल.