कॅनडा : उत्तर अमेरिका खंडाचा सु. ४३% प्रदेश व्यापणारे राष्ट्र. क्षेत्रफळ ९९,७६,१८५ चौ. किमी. लोकसंख्या २,१५,६८,३११ (१९७१). उत्तर अमेरिकेतील अलास्काचा व वेस्ट इंडीजचा प्रदेश सोडला, तर त्या खंडाच्या उत्तरेकडच्या अर्ध्याअधिक भागाचा व जवळच्या लहान मोठ्या बेटांचा समावेश कॅनडात होतो