केंद्र सरकारच्या वास्तविक शासन प्रमुख कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्यपाल हे जरी घटनात्मकदृष्ट्या राज्याचे प्रमुख असले तरी, ज्याप्रमाणे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असूनही पंतप्रधान हेच देशाचे खरे कार्यकारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे राज्यातही मुख्यमंत्री हेच राज्याचे खरे कार्यकारी प्रमुख असतात.असे असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत, राष्ट्रपती वा राज्यपाल यांची भूमिका निर्णायक असू शकते. उदाहरणार्थ ज्यावेळी निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाला संपूर्ण बहुमत मिळत नाही, तेव्हा राज्यात सरकार स्थापन करण्यात राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरू शकत. किंवा जर एखाद्या सत्तेत आलेल्या सरकारने बहुमत गमावले, तर राज्यपाल ते सरकार बरखास्त करू शकतात.