केरळ व तमिळनाडू हे एकेकाळी सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या एकच होते व एकत्रित भूभागाचे नाव तमिळक्कम असे होते. केरळाच्या बाबतीतील पहिला उल्लेख अशोकाच्या शिलालेखात केरळपुत्रम असा आढळतो. इसवी सनापूर्वीच्या मौर्य साम्राज्यानंतरच्या काळात केरळ प्रांतावर चेरा घराण्याचे राज्य होते.