हवामान विभागाने 1900 पासून नोंदवलेल्या तापमानाच्या हिशेबाने गत फेब्रुवारी महिना आजवरचा सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना ठरला आहे. त्यापाठोपाठ भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात एप्रिल महिन्यानेही मागच्या 122 वर्षांतील सर्व एप्रिल महिन्यांतील उष्णतेचा विक्रम मोडला आहे.