इराणमधील अतिप्राचीन नाण्यांना लिडियामधील नाण्यांमुळे प्रेरणा मिळाली. इराणी सम्राटाने चांदी आणि सोन्याची नाणी पाडली. त्यांच्या दर्शनी बाजूवर धनुष्यबाण किंवा भाला घेतलेल्या राजाचे चित्र असते. ग्रीसमधील प्राचीन नाणी प्रामुख्याने चांदीची आहेत.