नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी सदाहरित वृक्षांची उदाहरणे आहेत. आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.