क्रांती म्हणजे काय?
क्रांति' या शब्दाचा रूढ असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेल मौलिक परिवर्तन, असा त्याचा अर्थ होतो.
उत्क्रांती म्हणजे काय?
उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.
क्रांती व उत्क्रांती ह्यांचा परस्परसंबंध :
विश्वनियमानुसार क्रांती व उत्क्रांती यांचे प्रवाह अखंड व सतत वाहत असतात. कालाच्या उतरणीवरुन अकल्पनीय जोराने आपटत कोसळणार्या प्रपातांना क्रांती म्हणतात व समप्रदेशावर वाहत जाणार्या नदीप्रमाणे विश्ववृत्तीचे जे प्रगमनात्मक मंदौघ त्यांना उत्क्रांती म्हणतात. क्रांती व उत्क्रांती ही एकमेकांची कार्ये व कारणे होत. क्रांतीतून उत्क्रांती व उत्क्रांतीतून क्रांती उत्पन्न होणे हे उत्क्रांती - क्रांतिचक्र कालचक्राच्या आरंभापासून गतिमान झालेले आहे.
क्रांती आणि उत्क्रांती म्हणजे काय?
✅ Updated recently