व्यक्तिगत किंवा खाजगी सचिव हा सर्वांत जुना प्रकार असून मोठे अधिकारी अगर मंत्री अशा सचिवांची नेमणूक करतात. मोठया अधिकाऱ्यांच्या कामाचा व्याप मोठा असल्याने पत्रव्यवहार हाताळणे, कामाचे नियोजन करणे, बैठक/सभा आयोजित करणे, संबंधितांशी व बाहेरील व्यक्तींशी भेटी ठरविणे, भेटावयाला येणाऱ्यांचे स्वागत करणे इ.