ख्रिश्चन धर्म हा लोकसंखेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म आहे. ख्रिस्ती धर्माला जवळजवळ २००० वर्षांचा इतिहास आहे. या धर्माचा उगम पालेस्तीन (म्हणजे आताचा इस्राएल देश) येथे झाला. प्राचीन यहुदी धर्मातून ख्रिस्ती धर्माचा विकास होत गेला.