असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी ५ फेब्रुवारी, १९२२ रोजी घेतला.