गाळ म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
गाळ ही संज्ञा पाण्यात किंवा इतर द्रवांत मिश्रित असलेल्या घन पदार्थांना उदा., पुराच्या गढूळ पाण्यातील दगड, माती किंवा रेती यांसारख्या पदार्थांना देण्यात येते; पण भूवैज्ञानिक वर्णनात पाण्यात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या पदार्थांचाही गाळ किंवा अवसाद या संज्ञेत समावेश केला जातो.