GIT प्रणाली तयार होण्यामागे एक गोष्ट दडलेली आहे. आपल्याला माहित आहे की Linux कर्नल हे Open Source आणि अतिशय व्यापक प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टवर अनेक जण काम करत असल्याने लहान लहान तुकड्यामध्ये ते विकसीत झाले.Linux च्या सुरवातीच्या बऱ्याच काळात (१९९१ ते २००२) वेळोवेळी केलेले बदल archived फाईल्सच्या माध्यमात संग्रहीत केले जात. २००२ मध्ये मात्र यासाठी linux community, BitKeeper नावाची एक Propritory DVCS System वापरु लागले. २००५ मध्ये मात्र Linux आणि ही कंपनी यांत वाद झाल्याने ही मोफत सेवा बंद करण्यात आली. आणि हीच गोष्ट Linux Community, प्रामुख्याने लायनस टोरव्हॉल्ड्स (Linus Torvalds) Linux चा जनक, ह्यांना GIT निर्माण करण्यास प्रेरक ठरली व GIT चा जन्म झाला.