आपल्यापैकी अनेकांसाठी गृहकर्ज ही सर्वात मोठी आर्थिक बांधीलकी असल्याने याबाबतीत पद्धतशीर दृष्टिकोन अतिआवश्यक आहे. जागांच्या वाढत्या किमती पाहता मध्यमर्गीयांसाठी गृहकर्जास काहीच पर्याय नाही. गृहकर्ज हे दीर्घ कालावधीचे आणि घर तारण असल्याने, कर्ज देणाऱ्या बॅंक्स, गृह कर्ज संस्था साठी सर्वात सुरक्षित कर्ज असे समजण्यात येते.