परिषदेतून निष्पन्न झालेल्या जकातविषयक सवलतींचा बहुपक्षीय करारामध्ये एकत्रितपणे अंतर्भाव करण्यात येऊन त्या करारास 'गॅट' हे नाव देण्यात आले. या करारावर ३० ऑक्टोबर १९४७ रोजी सह्या झाल्या आणि तो १ जानेवारी १९४८ पासून अंमलात आला.