प्रभाग पंच आणि सरपंच मिळून ग्रामपंचायत बनते. ग्रामपंचायतीची निवडणूक पाच वर्षांसाठी असते. ग्रामपंचायतीचा एक सचिव असतो जो ग्रामसभेचाही सचिव असतो. ही व्यक्ती निवडून आलेली नसून सरकारद्वारे नियुक्त केलेली आहे.