ग्रामसभेचा सदस्य कोण होऊ शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे. ग्राम सभेचे सदस्य- ग्राम पंचायत क्षेत्रातील सर्व महसुली गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेला १८ वर्षावरील प्रत्येक ग्रामस्थ) या ग्रामसभेच्या सदस्य असतात. एका आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे