स्थानिक शासन संस्थांचे साधारणपणे ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे 'पंचायती राज्यव्यवस्था' म्हटले जाते.