दीक्षाभूमी, चंद्रपूर:- हे एक प्रसिद्ध बौद्ध तीर्थस्थळ आहे. येथे १६ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यांनी याआधीच्या दोन दिवशी म्हणजेच १४ व १५ ऑक्टोबर रोजी नागपूर मधील दीक्षाभूमी येथे ७ लाख अनुयायांना दीक्षा दिली होती.महत्त्वाचे उद्योग- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. बाबा आमटेंचा आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.