चित्रपटकथेचे दोन भाग असतात : एक म्हणजे मूळ कथा व दुसरा म्हणजे त्या कथेच्या आधारे प्रत्यक्ष चित्रीकरणासाठी तयार केलेली पटकथा. अनेकदा वाङ्‌मयात प्रसिद्ध असलेल्या लघुकथांची मूळ कथा चित्रपटात स्वीकारलेली असते. उदा., वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा इ.