चीनने ३५ वर्षांपूर्वी लागू केलेल्या कठोर 'एक मूल' धोरणानंतर २०१५ मध्ये जोडप्यांना दुसर्‍या मुलाला जन्माला घालण्यास परवानगी दिली. आता चीन सरकार तिसरे मूल जन्मास घाला, असे सांगत आहे. लोकसंख्या दरातील घट ही अनियंत्रित होऊन त्याचे पर्यवसान चीनच्या अधोगतीस आणि साम्यवादाच्या पडझडीस निमंत्रण देण्यासारखेच आहे.