चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना हद्दपार होणार असून यापुढे ऑनलाईन पद्धतीने बँकेतले तुमचे चेक खात्यात वळते केले जाणार आहेत. त्यामुळे बँकेत चेक वटण्याचा अवधी कमी होणार आहे. राज्यांतर्गत चेक असेल तर तो वटण्यासाठी साधारणपणे तीन दिवस लागतात. तर इतर राज्यांतील चेक वटण्यासाठी आठवडा लागतो.