छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती त्यांची माहिती पुढीलप्रमाणे

१) सखुबाई/सकवारबाई - यांचा जन्म १६५० मध्ये राणी सईबाईंंच्या पोटी झाला, यांचाविवाह त्यांचे मामेभाऊ महादजी बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी लावून दिला होता. शंभुराज्यांच्या हत्येनंतर महादजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर डांबून ठेवले होते जेथे त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून सखुबाई निपुत्रिक सती गेल्या होत्या.

२) राणूबाई - यांचा राणी सईबाईंच्या पोटी झाला. यांचा विवाह जिजाऊंच्या माहेरच्या कुळात वाईंंजच्या जाधवराव यांच्याशी झाला होता. या शंभुराज्यांच्या सोबत सज्जनगडाहून मुघलांकडे गेल्या होत्या पण शंभुराज्यांच्या बरोबर सुटू शकल्या नाहीत आणि कैदेतच निवर्तल्या.

३) अंबिकाबाई - यांचा जन्म राणी सईबाईंच्या उदरी झाला आणि यांचे लग्न हरजीराजे महाडीकांशी झाले होते जे शंभुराज्यांच्या काळात दक्षिणेत अधिकारी होते, शंभुराज्यांच्या निधनानंतर काहीच काळात हरजीराजे गेल्याचा उल्लेख आहे. जेव्हा छत्रपती राजाराम महाराज जिंजीस आले तेव्हा खरतर अंबिकाबाई त्यांना जिंजी देण्यास तयार नव्हत्या पण त्यांचा बरोबरच्या सुज्ञ लोकांनी त्यांना तो द्यायला लावला.

४) छत्रपती संभाजी महाराज - (१६५७-१६८९) शंभुराज्यांच्या बाबतीत कोरावर अनेक उत्तरं आहेत त्यामुळे त्यांची माहिती देण्यासाठी हे उत्तर छोटे पडेल वाटते.

५) राजकुंवर उर्फ नानीबाई - या राणी सगुणाबाईंना झालेल्या एकुलत्या एक कन्या ज्यांचा विवाह शंभुराज्यांच्या साळ्याशी , गणोजी पिलाजी शिर्केशी झाला होता. यांच्या लग्नप्रसंगी शिवरायांनी गणोजीस मूळ झाल्यावर वतन देऊ म्हटले होते आणि त्यामुळे गणोजीची हाव वाढली, त्याने शंभुराजांना अनेकदा याची आठवण करून दिली पण वतन न मिळाल्यामुळे शेवटी तो मुघलांकडे निघून गेला. नंतर हा जिंजीस वेढा देऊन असताना खंडो बल्लाळांकडून याने वेढा ढिला करण्यासाठी दाभोळचे वतन मिळविले.

६) कमलाबाई - यांचा जन्म राणी सकवरबाई यांच्या पोटी तथा विवाह जानोजी पालकर यांच्याशी झाला होता.

७) छत्रपती राजाराम महाराज - (१६७०-१७००) यांच्याबद्दलही येथे लिहिणे उत्तर फार वाढवेल म्हणून आपण अधिक माहिती साठी श्री प्रशांत पाटील यांचे उत्तर बघावे.

८) बाळीबाई/दीपाबाई/दादीबाई - या राणी सोयराबाई यांची कन्या. यांच्याबद्दल माझ्या वाचनात एवढेच आहे की यांचे लग्न विसाजीराव नामक सरदाराशी झाले होते.