जपानी भाषेत "जपान" या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा (日本) (कांजी = चिनी / जपानी भाषेचे वर्ण) अर्थ "सूर्य उगम" असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.