कुटुंबाच्या या समूहाला 'जमात' असेही म्हणतात. एकच नाव, एक भाषा, एकाच भूभागावर निवास असणारा व व्यवसायविषयक विधिनिषेध असणारा समूह हे त्याचे वैशिष्ट्य आहे. जातीचे लोक अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. प्रत्येक जातीचा एखादा विशिष्ट असा व्यवसायही असतो.