१९५५ साली कूळकायद्यात 'कसणाराचा दिवस' ही क्रांतिकारक सुधारणा करण्यात आली. १ एप्रिल १९५७ रोजी कुळांना त्यांच्याकडे असलेल्या जमिनीवरील मालकी हक्क मिळाले असे ठरविण्यात आले; पण कुळांनी स्वखुषीने जमीन सोडून देण्याची तरतूद असल्याने तथाकथित खुषीचे राजीनामे फार मोठ्या प्रमाणावर लिहून घेतले गेले.