जलसिंचन म्हणजे काय त्याचे प्रमुख उद्देश काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणा-या १४ जिल्हयांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते.