जहाज चालविण्यासाठी वाऱ्याला अडविणारे कापडाचे पडदे म्हणजे शिडे टांगण्याची सोय असलेल्या जहाजाला शिडाचे जहाज किंवा गलबत म्हणतात आणि जहाज चालविण्यासाठी एंजिनामध्ये उत्पन्न होणाऱ्या यांत्रिक शक्तीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने उपयोग करीत असणाऱ्या जहाजाला आगबोट म्हणतात.