महामंदी : ऑगस्ट १९२९ ते मार्च १९३३ अशी दीर्घकाळ चालू असलेली तीव्रतम जागतिक मंदी. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या काळात भांडवलशाही राष्ट्रांतील अर्थव्यवस्थांना तेजी-मंदी चक्राने ग्रासून टाकले होते.