जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank ही राज्य सहकारी बँक यांच्या निर्देशानुसार कार्य करत असते. म्हणून सहकारी बँक रचनेमध्ये राज्य सहकारी बँक सर्वोच्च आहे. राज्य सहकारी बँक सहकारी बँकांची शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते.


लोकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी किंवा आर्थिक सहकार्य साधण्याच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अस्तित्वात आल्या. सहकारी बँका या स्वतंत्र नसून यामध्ये सहकार्याची एक शृंखला पाहावयास मिळते. 
राज्य सहकारी बँक

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank ही राज्य सहकारी बँक यांच्या निर्देशानुसार कार्य करत असते. म्हणून सहकारी बँक रचनेमध्ये राज्य सहकारी बँक सर्वोच्च आहे. राज्य सहकारी बँक सहकारी बँकांची शिखर बँक म्हणूनही ओळखली जाते.  

 महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक म्हणून कार्य करते. महाराष्ट्र राज्याच्या राज्य सहकारी बँकेची स्थापना स्वातंत्र्य पूर्वीचा ११ ऑक्टोबर १८९१ मध्ये झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आपल्या चार प्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून कार्यकर्ते ही प्रादेशिक कार्यालये औरंगाबाद, नाशिक, पुणे व नागपूर या ठिकाणी आहेत. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी बँक व्यवसायाचे प्रतिनिधित्व करते. ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या विविध सहकारी बँक पतसंस्थांना बचत गटांना एकत्रित ठेवण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत असते. सहकारातून मिळणाऱ्या विविध सुविधा व वित्त विषयक बाबी ग्रामीण भागातील या संस्थान पर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महत्त्वाची भूमिका बजावतात. 

भांडवल उभारणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठेवी कर्जे स्वतंत्र रीतीने उभारलेला निधी इत्यादी माध्यमांचा वापर करतात. ग्रामीण भागामध्ये आर्थिक सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या संजीवनी ठरलेल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या एकूण ३६ जिल्हे असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मात्र ३१ आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वित्तीय समावेशन घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सहकारी संस्था ठरतात. आर्थिक व वित्तीय सुविधा ग्रामीण भागापर्यंत व तळागाळापर्यंत पोहोचणे म्हणजे वित्तीय समावेशन होय. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत आर्थिक सुविधा पोहोचविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक / DCC Bank महत्त्वाच्या आहेत.