भूगर्भात गाडल्या गेलेल्या वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांच्या नैसर्गिक प्रक्रियांदवारे निर्माण झालेल्या इंधनाला जीवाश्म इंधन म्हणतात. ही इंधने अनेक कोटी वर्षांपूर्वी, काही तर ६५ कोटीपेक्षा जास्त वर्षांपूर्वी असलेल्या जीवांपासून निर्माण झालेली आहेत.