प्राण्यांचे संशोधन करीत असताना आरंभी वॉटसनने सांकेतिक मानसशास्त्रीय संकल्पनांचाच वापर केला होता. परंतु नंतर तो त्यासाठी वर्तनवादी संज्ञा वापरू लागला आणि पुढे मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठीही त्याने त्या वापरल्या. मानसशास्त्रीय संशोधनासाठी-विशेषतः प्रयोगिक निरीक्षणासाठी-मानवतेवर प्राण्यांचा वापर सोयीस्कर ठरतो.