ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण आपल्याला पाहणे, आपले खरे स्वरूप ओळखणे म्हणजे ज्ञान. सामान्य जनांना संसार सागरातून उद्धरून जाण्यासाठी सद्गुरू जे ज्ञान देतात, ते आत्मज्ञान. प्रत्येक मनुष्याला जे ज्ञान होते, त्यात दोन गोष्टी असतात.