ज्वलन : ज्या रासायनिक विक्रियेत उष्णता व अनेकदा प्रकाशही निर्माण होतो तिला व्यापक अर्थाने ज्वलन म्हणतात. क्लोरीन वायूमध्ये अँटिमनीची पूड टाकली असता तिचे ज्वलन होऊन अँटिमनी क्लोराइड बनते, ही विक्रिया ज्वलनाचे एक उदाहरण आहे.