माणसाच्या समाजजीवनामुळे त्याचा प्रसार अधिक सुलभ होतो. परंतु त्याच्या प्रसारामुळे मानवी समाजजीवनही बदलू लागते. ते जसे अधिक सुलभ होते व त्याच्या क्षमता अधिक वाढतात, तसेच ज्या माध्यमाद्वारे तंत्रज्ञानाचा प्रसार होतो, ते माध्यमही माणसाच्या अभिव्यक्तीत, त्याच्या भानात व आत्मभानात बदल घडवत असते.